निंभोरा येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या शेतामध्ये मृतावस्थेत आढळला

भडगाव :प्रतिनिधी
तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असतांना एका शेतामध्ये हा बिबट्या मृतावस्थेत सोमवार १० रोजी आढळून आला . बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती.

निंभोरा शेतशिवारात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दिलीप बाविस्कर या शेतकऱ्याच्या शेतात मका पिकाला पाणी टाकत असतांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. मुलाणे, वनपाल नंदू पाटील, नाकेदार मुकेश बोरसे, वनरक्षक दुर्गादास वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

दिलीप बाविस्कर यांच्या शेतातील मक्याच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने त्याची पाहणी करीत असताना बिबट्या मृतावस्थेत दिसून आला.या[रसंगी उपसरपंच विश्वास पाटील, ग्रा. पं. सदस्य रविंद्र पाटील, सदस्य छोटू बाविस्कर, पोलिस पाटील शरद पाटील तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.