भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे अनावरण तसेच सावित्रीच्या लेकी लेझीम गृप मंडळाचे उदघाटन ना. संजय भाऊ सावकारे कॅबिनेट मंत्री वस्त्रोद्योग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते सोमवार दिनांक 10 मार्च रोजी करण्यात आले, प्रारंभी ना. संजय भाऊ सावकारे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण केले. त्यानंतर गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व महिला सावित्रीच्या लेकी ग्रुप लेझीम मंडळाच्या पदाधिकारी यांनी ना. संजय सावकारे यांचे औक्षण करून, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना ना संजय सावकारे यांनी गुरु चंद्रमणी बुद्ध विहार येथे प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत मोठे संविधान भवन बांधण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यात प्रशस्त हॉल, लायब्ररी, आडोटोरियम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस , वॉल कंपाऊंड, सुशोभित गार्डन, पार्किंग ही सगळी व्यवस्था असेल. आपले मनोगत व्यक्त करताना .ना. संजय सावकारे यांनी भावनात्मक होऊन आज आपण जे सुखी आहोत आपला देश सुखी आहे महिला सुरक्षित आहेत आपल्याला जगण्याचा अधिकार आपले संविधान देते आणि ते संविधानाचे निर्माते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत , डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आपलेच नसून पूर्ण भारताचे एक आदर्श आहेत आपण त्यांना मर्यादित न ठेवता त्यांनी दिलेल्या संविधानामुळे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक आज सुखी आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना सर्वप्रथम ओबीसींचा विचार केलेला आहे.
आज आपली देशाची प्रगती संविधानामुळे झालेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथील जिवंत हावभाव करणारी प्रतिकृती चे वर्णन त्यांनी केले. आणि प्रत्येकाला आवाहन केले .जर तुम्ही दिल्लीला गेले तर त्या स्थळाला तुम्ही नक्की भेट द्या .असे सांगितले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. धुंदे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरु चंद्रमणी बुद्धिस्ट बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सावित्रीच्या लेकी लेझीम ग्रुप तसेच मुख्याध्यापक जे .पी . सपकाळे सर ,राजकुमार साळवे ,यांनी परिश्रम घेतले .तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मनोहर संदानशिव यांनी केले.



