महिला दिना निमित्त भुसावळ तालुका विधी समितीतर्फे दर्यापूर वरणगावसह सुभाष नगर परिसरात महिला दिन साजरा ;


भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुका विधी समितीच्यावतीने यांच्यावतीने दर्यापूर वरणगावसह सुभाष नगर परिसरात महिला दिन साजरा करण्यात आला

यावेळी अँड . जास्वंदी भंडारी तसेच भुसावळ विधी समितीच्या पीएलव्ही संगीता भामरे,,पीएलव्ही जयश्री इंगळे यांनी महिला दिना निमित्त सुभाष नगर परिसरातील महिलांना कौटुंबिक वाद विषयी कायदयाची माहिती दिली तसेच या कायदयाने कश्या प्रकारे आपल्याला न्याय मिळू शकतो या बद्दल समजून सांगितले तर
पीएलव्ही संगीताताई भामरे यांनी महिला दिना निमित्त व महिला दिन कधी पासून साजरा केल्या जातो ,,व तो कसा साजरा करावयाचा असतो आणि महिलांचे काय महत्त्व आहे या विषाया संदर्भात महिलांना माहिती देवून जनजागृती केली.
पीएलव्ही जयश्रीताई इंगळे यांनी महिला दिना निमित्त शुभेच्छा दिल्या व महिला सरकारी योजना कश्या प्रकारे मिळतील तसेच रोजगाराचा प्रश्न कसा सोडवता येईल या विषयावर मार्गदर्शन केले..
आणि सर्व महिलांना कायद्याची माहिती पत्रक वाटून हा कार्यक्रम संपन्न केला.
सदरील कार्यक्रमात ऍड.जास्वंदी भंडारी ,,पीएलव्ही संगिता ताई भामरे ,,पीएलव्ही जयश्री इंगळे , दर्यापूर गावाचे ग्रामपंचायत सदस्. बोधीसत्व अहिरे ,यांच्या सोबतच जवळ जवळ शेकडो महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या.