भुसावळ (प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य व रक्त चाचणी शिबिर किमया सेवाभावी बहुउद्देशीय संस्था व साईलीला महिला बचत गट यांनी नगरपरिषद दवाखान्याच्या सहकार्यातून आयोजित केला
शिबिराचे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी डॉ किर्ती फलटणकर यांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच त्यांच्या सोबत आलेल्या सर्व टीमचेही स्वागत व इतर सर्व उपस्थित महिलांचा महिला दिनानिमित्त पुष्प देऊन स्वागत करण्यात आले आले. यावेळी डॉक्टर कीर्ती फलटणकर यांनी महिलांना आरोग्याची काळजी महिलांनी कशी घ्यावी ,कसा आहार घ्यावा याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले किमया सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ जास्वंदी भंडारी यांनी प्रास्ताविकात महिलाही घराचा कणा आहे सर्व घराची काळजी घेतांना ती नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते वेळेवर जेवण नाश्ता नाही त्यामुळे पुरेसे पोषण शरीराला मिळत नाही त्यामुळे एका विशिष्ट वयानंतर तिला विविध आजारांना सामोरे जावे लागते वेळोवेळी आवश्यक असणाऱ्या आजारांच्या व रक्ताच्या चाचण्या करण्याकडे स्त्रियांचे दुर्लक्ष असते ही महिलांची अडचण व मानसिकता लक्षात घेऊन संस्थेने व गटाने महिलांसाठी महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्याचा मानस ठेवून या शिबिराचे आयोजन केले असे यावेळी त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.
नगरपालिका दवाखान्याचे यूपीएचसी श्री हर्षल जैन, सौ पूनम फोलाने, पूजा महाजन, सुनीता चंडोल आशा वर्कर गायत्री रावते, स्वाती रावते ,अर्चना नेते या सर्व टीमने या शिबिरासाठी सहकार्य केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता राणे यांनी केले तर आभार नेहा यावलकर यांनी मानले
डॉ. कीर्ती फलटणकर यांनी महिलांचा रक्तदाब व आरोग्याची तपासणी करून योग्य त्या गोळ्या औषधे दिली.
या दोन तासांच्या तपासणीत शिबिराचा लाभ हुडको कॉलनीच्या 51 महिलांनी घेतला या शिबिरासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यासाठी किमया बहुउद्देशीय संस्था व साईलीला महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.जास्वंदी भंडारी यांचे सह सभासद सौ सुनीता अनिल राणे नेहा यावलकर ,विजया पालखे, स्वाती श्री गोंदेकर ,अनिता राणे,मनीषा भंडारे, सुनीता सुनील राणे ,प्राजक्ता गंधे हर्षदा चौधरी, कृष्णा भराडिया ,वैशाली चौधरी यांनी श्रम घेतले तसेच रानातला महादेव मंदिराचे पुजारी अतुल गुरव यांनी व समाजसेवक दिपक टेकवानी यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले



