विदर्भ पंढरीत भुसावळची पालखी दाखल:

भुसावळ : विदर्भाची पंढरी तथा संतनगरी श्री क्षेत्र शेगांव येथे दि. ८ राेजी ‘गण गण गणात बाेते’ च्या गजरात श्री गजानन महाराज देवस्थान , जामनेर राेड, भुसावळ ची पालखी उत्साहात दाखल झाली.
दरम्यान, दि.४ राेजी या पालखीचा पहिला मुक्काम श्री क्षेत्र काेथळी ला झाला असता श्री मुक्ताबाई चे दर्शन घेत पालखी दि.५ राेजी मलकापूर कडे रवाना झाली.दि.६ राेजी नांदुरा व दि.७ राेजी अन्नकुटी व तद्नंतर दि.८ राेजी ही पालखी सकाळी ११:३० वाजता शेगावात दाखल हाेत गजानन महाराज मंदिरात प्रवेश करीत सर्व भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या पालखीचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने तसेच रस्त्याच्या दुतर्फा दिवे लावीत, रांगाेळ्या काढीत स्वागत करीत भाविक पालखीचे दर्शन घेत हाेते. तसेच पालखीतील वारक-यांची चहा,नाश्ता व भाविकांची जेवणाची साेयही ठेवली हाेती.
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह इतरही प्रातांतून पालख्या शेगावात दाखल झाल्याने संत नगरीला जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले हाेते.