भुसावळ – जळगाव रनर्स ग्रुपतर्फे राज्यस्तरीय खान्देश रनचे ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी या वेगवेगळ्या श्रेणीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ६५ धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. त्यापैकी ३४ धावपटू २१ किमी तर ३१ धावपटू १० किमी गटात यशस्वी ठरले. यात स्वाती फालक यांनी २१ किमी अर्धमॅरेथॉन केवळ २ तास ३९ मिनिटात पूर्ण करून महिलांच्या गटात त्या तृतीय ठरल्या. आयोजकांतर्फे त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंनी मोठा जल्लोष केला व आनंद साजरा केला. या स्पर्धेत संस्कार प्रवीण पाटील या १५ वर्षीय धावपटूने सलग दुसऱ्या वर्षी २१ किमी धावून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याबद्दल असोसिएशनचे प्रमुख प्रविण फालक, डॉ तुषार पाटील, डॉ नीलिमा नेहेते, डॉ चारुलता पाटील, गणसिंग पाटील, डॉ प्रविण वारके यांनी विशेष आनंद व्यक्त केला. याशिवाय उमेश घुले यांनी २१ किमी केवळ १ तास ४६ मिनिटात धावून आपली चमक दाखवून दिली. त्यांच्या पाठोपाठ डॉ तुषार पाटील यांनी १ तास ५० मिनिटे, युवराज सूर्यवंशी यांनी १ तास ५३ मिनिटे, विजय फिरके यांनी १ तास ५५ मिनिटे, निलेश पाटील यांनी १ तास ५५ मिनिटे, जितेंद्र चौधरी यांनी २ तास १ मिनिट,छोटू गवळी यांनी २ तास ९ मिनिटे, राजेंद्र ठाकूर यांनी २ तास ११ मिनिटे, डॉ प्रविण वारके यांनी २ तास १२ मिनिटात तर मंगेश चंदन यांनी २ तास १६ मिनिटात २१ किमी धावून आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय दिलीप जोनवाल, विद्याधर इंगळे,तेजस चौधरी, ताराचंद खरारे, डॉ रोहित पाटील, डॉ निलेश भिरूड, डॉ महेश फिरके, फिरोज जरीवाला, राहुल चौधरी, डॉ सुयोग तन्नीरवर या धावपटूंनी देखील २१ किमी मध्ये आपली वैयक्तिक चांगली कामगिरी केली.



