भारतीय पत्रकार महासंघाच्या वतीने मुकबधिर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करून पत्रकार दिन साजरा ;

चोपडा:– येथील भारतीय पत्रकार महासंघ कडून मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी यांना स्वेटर वाटप करून पत्रकार दीन साजरा करण्यात आला.
त्यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. भारतीय पत्रकार महासंघ चे प्रकाश सरदार यांनी समजा बद्दल पत्रकारितेचे जबाबदारी काय आहे व पत्रकार कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले.
तर प्रमुख अतिथी भारतीय पत्रकार महासंघ चे केंद्रीय सचिव प्रदीप पाटील, उपाध्यक्ष राकेश कोल्हे, प्रकाश सरदार, रेल्वे क्राईम चे संपादक शकील पटेल, दैनिक बातमीदार चे संपादक हेमंत पाटील, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलिस निरीक्षक मधूकर साळवे ,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, संस्था अध्यक्ष लिला पाकळे, मुख्यध्यापक नम्रता धनगर,रोटरी क्लब चे एम. डब्लू. पाटील, चेतन पाटील, पवन गुजराथी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते मुकबाधिर विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन विभागीय अध्यक्ष विलास पाटील, तालुका प्रतिनिधी सचिन जयस्वाल, तालुका सूर्यवंशी यांनी केले होते. तर कार्यक्रम करिता निलेश महाजन, राकेश पाटील, यांनी परिश्रम घेतले आणि सुत्र संचालन व आभारप्रदर्शन भावलाल पाकळे यांनी केले.