भुसावळ तेली समाजातर्फे श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी साजरी ; समस्त बांधवांनी वाहिली आदरांजली ;

भुसावळ – जगतगुरु तुकाराम महाराजांच्या मुळ गाथेचे लेखनकर्ते आपल्या अभंगातून समाजसुधारणेची व मानवतेची शिकवण देणारे, तेली समाजाचे आराध्य दैवत थोरं संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील तेली समाजबांधवांनी पूजन करून विनम्र अभिवादन केले . सुरुवातीला अध्यक्ष संजय चौधरी , कैलास चौधरी , अशोक चौधरी ( आऊ भाऊ ) , सौ कविता चौधरी , सुरेश चौधरी , गणेश सोनवणे यांनी दीप प्रज्वलन करून संताजी महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन केले . प्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज यांना समाजबांधवांनी पुष्पांजली वाहून आदरांजली वाहिली .

कार्यक्रम प्रसंगी सौ वत्सला सुखराम सोनवणे यांनी श्री संताजी महाराजांची आरती व अभंग सादर केले . तर सौ रेखा धुपे यांनी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवनाविषयी माहिती सांगितली . याप्रसंगी अध्यक्ष संजय चौधरी यांनी समाजकार्यात सर्वानी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करून समाजाच्या उन्नतीसाठी समाज संघटन आवश्यक असल्याचे सांगितले तर उज्वला बागुल यांनी महिलांनीही पुढे येऊन समाज कार्यात सहभागी व्हावे , यामुळे निश्चितच समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळेल व सामाजिक प्रगती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली . प्रदीप चौधरी यांनी सामाजिक कार्यक्रमात येणाऱ्या अडचणी सांगून त्यात सुधारणा करण्याचे आवाहन केले

यावेळी कार्यक्रमास रमेश चौधरी , नारायण चौधरी , अरुण चौधरी , एल पी चौधरी , संतोष चौधरी ,( दाढी ) कैलास चौधरी चंद्रकांत चौधरी , उमाकांत चौधरी , देविदास तेली , निलेश चौधरी , अनिल चौधरी , भूषण चौधरी ,गणेश चौधरी ,संतोष पुंडलिक चौधरी , एसटी चौधरी , अरुण चौधरी ,जीवन पाटील ,संतोष धुपे ,सुरज ठाकरे , मोहन पैठणकर ,रघुनाथ चौधरी , बाबुराव चौधरी ,सुदाम सोनवणे , किशोर चौधरी ,शंकर चौधरी , चंद्रकांत बागुल यांचे सह अनेक समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अशोक चौधरी यांनी तर आभार सुनील चौधरी सर यांनी मानले . सर्व बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश चौधरी , अशोक चौधरी , सुधाकर पाटील , सुनील चौधरी सर , गणेश सोनवणे , बाळू चौधरी , दिलीप चौधरी , देवीदास चौधरी , गोपाल चौधरी , किरण चौधरी , विजय चौधरी राकेश चौधरी ,नरेंद्र चौधरी , प्रदीप चौधरी ,सुनील चौधरी यांनी परिश्रम घेतले