वरणगावात उप तहसील कार्यालयासाठी स्वाक्षरी अभियानास प्रारंभ ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ;

वरणगाव – वरणगाव शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीत तहसील कार्यालयाची शाखा सुरू करावी तसेच या इमारतीत खरेदी विक्री व सिटी सर्व्हे कार्यलय व नगरपरिषदेचे प्रभाग कार्यालय सुरू करावे तसेच विकास कॉलनी पवन नगर व प्रतिभा नगरात पिण्याची टाकी मंजूर आहे त्या पाण्याच्या टाक्या त्याच प्रभागात पर्यायी जागेवर तातडीने बांधाव्यात या मागणीसाठी बुधवारी वरणगावकरांच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्याचा शुभारंभ करण्यात आला.


यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, मनोहर सराफ, बळीराम सोनवणे, रमेश पालवे, अनिल वंजारी, नाना चौधरी, शशी चौधरी, पंकज नाना चौधरी, अशपाक काझी, मयूर शेळके, भास्कर गवळी, योगेश माळी, फिरोज खाटीक, अजमल खान यांच्यासह 915 महिलांसह नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा सुरू ठेवणार असल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.