बोदवड (प्रतिनिधी) – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष आणि तहसील कार्यालय बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न झाला.

प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बोदवड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विकास कोटेचा, प्रमुख अतिथी म्हणून बोदवड तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष गोपाल अग्रवाल, बोदवड तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष गोपीचंद सुरवाडे, ज्येष्ठ पत्रकार . महेंद्र पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष . संजय अग्रवाल, नायब तहसीलदार अनिल नाडेकर, बोदवड तहसील येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी करुणा बडगे, भागवत गायकवाड, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील उपस्थित होते.
सुजान व सजग ग्राहक बना, आपले अधिकार जाणून घ्या असे प्रतिपादन करत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष विकासजी कोटेचा यांनी अनेक उदाहरणे देऊन उपस्थितांना ग्राहकाचे महत्त्व ग्राहक दिन प्रसंगी पटवून दिले. ग्राहक हा चोखंदड असला पाहिजे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कुठलेही प्रॉडक्ट घेण्यापेक्षा स्थानिक ठिकाणाहूनच ते घ्यावे म्हणजे आपली फसवणूक होणार नाही सोबतच स्थानिक व्यापाऱ्यांसोबत आपले हितसंबंध देखील जोपासले जातील आणि स्थानिक विकास त्या ठिकाणी घडून येईल असेही स्पष्ट केले.
बोदवड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपालची अग्रवाल यांनी ग्राहकाची व्याख्या आणि त्याची व्याप्ती, जबाबदारी आणि कर्तव्य विशद केले.
बोदवड तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष गोपीचंद सुरवाडे यांनी ग्राहकाची ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते त्याबद्दल जागृती घडून आणली.
बोदवड तालुक्यातील जेष्ठ पत्रकार महेंद्र पाटील यांनी मोबाईल ॲप वापरणे अतिशय घातक आहे असे सांगत डिजिटल हेअरिंग, डिजिटल मार्केटिंग द्वारे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे प्रसंगी अनेक ग्राहक या फसवणुकीमुळे मृत्यूला आमंत्रण देत आत्महत्या करतानाचे ही प्रकार समाजात घडत आहेत असे सांगितले. ग्राहकांनी जागृत राहून आपले पासवर्ड, अकाउंट नंबर, ओटीपी किंवा इतर गोपनीय गोष्टी खात्री केल्याशिवाय कोणालाही सांगू नये अन्यथा आपले फसवणूक होऊ शकते असेही नमूद केले.
नायब तहसीलदार आणि बोदवड तहसील पुरवठा निरीक्षक भागवत गायकवाड यांनी देखील ग्राहकांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांवर प्रकाश टाकला.
प्रसंगी बोदवड शहरातील आणि तालुक्यातील रेशन दुकानदार मेरसिंग परदेशी, दिनेश सिंग राजपूत, प्रशांत पाटील, रवी कुमार पालवे, पुरवठा विभाग अभियंता अमोल पाटील, आणि महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बोदवड तहसील येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी करुणा बडगे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रूपाली तायडे, प्रा. नितेश सावदेकर, प्रा. भूषण धनजे, राजू मापारी, आनंद माळी, आचल गायकवाड, अंकिता उचांडे, प्रतीक जावळे यांनी सहकार्य केले.


