जळगाव – पाईप लाईन चोरी प्रकरणात आरोपीला पाठीशी घातल्याचा आरोप अधिवेशनात आमदार राजूमामा भोळे यांनी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी जळगाव तालुका निरीक्षकांची तडकाफडकी बदली केली त्याशिवाय एरंडोल निरीक्षकांचीही बदली करण्यात आली.
जळगावातील पाईप लाईन चोरी प्रकरणात आमदार राजूमामा भोळे यांनी पोलिसांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पाईप लाईन चोरी प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयिताचे नाव चुकवून त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप केल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांची सोमवारी सायंकाळी नियंत्रण कक्षात बदली केली तर त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
एरंडोल पोलीस ठाण्याचे प्रभारी सतीश गोराडे यांची सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभारही देण्यात आला आहे तर त्यांच्या जागी सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी नीलेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



