भुसावळ – येथील सेंट पॉल सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मधे रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा विषय ‘खेळ आणी स्पर्धा ‘ असा होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेच्या डीआरएम ईती पांडे,टान्या अॅरटून,स्वरण संधू,प्रदीप केस्टेलिनो,शाळेचे सेक्रेटरी समीर शेफर्ड,प्रिंसीपल रुबीया शेफर्ड उपस्थित होते.
सुरुवात शाळेचे सेक्रेटरी समीर शेफर्ड यांनी प्रार्थला कुरुन केली. सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला होता. इयत्ता पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले व नृत्याद्वारे महान खेळाडूंची जीवनकथा सादर केली. पालकांनी पर्यावरण संरक्षणावर लघुनाट्य सादर केले, प्रसंगी शाळेत झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डीआरएम ईती पांडे यांनी स्वतःचे खेळाविषयीचे अनुभव जिंकण्यासाठी केलेले अथक परिश्रम आणि त्यातून मिळालेले यश विद्यार्थ्यांना व पालकां समोर व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शिस्तबद्धपणा व खेळांचे महत्व याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता येशू ख्रिस्त यांच्या जन्म महोत्सवाने करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांनी उत्साहाने भाग घेतला सर्व पालकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आभार समीर शेफर्ड यांनी आपले विचार व्यक्त करून मानले.

फोटो कॅप्शन – भुसावळातील सेंट पॉल स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करताना विद्यार्थी.


