२४ डिसेंबर रोजी दर वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून, जळगाव शाखेच्या वतीने २१ डिसेंबर रोजी विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थी ग्राहक जागृती ह्या विषयाबद्दल सचिव डॉ. नितीन धांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपण कसे सजग ग्राहक राहून स्वतःला फसवण्यापासून वाचवू शकतो, ग्राहक संरक्षण कायदा १९८६, व २०१९, तसेच ग्राहकांनी फसवणूक झाल्यास कुठे व कशी दाद मागावी ह्याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्राहक पंचायत, महाराष्ट्र कशी सदैव तत्पर आहे हे श्री. धांडे यांनी स्पष्ट केले.
ह्या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सतीश मालकर सर, सचिन पाटील, तसेच पंचायत चे अध्यक्ष गुरुबक्ष जाधवानी, तालुका अध्यक्ष शरद सोनावणे, तालुका सचिव सौ. मनीषा पाटील, सौ. आशा मौर्य, माधुरी शिंपी, वंदना मंडावरे हे उपस्थित होते.




