भुसावळात १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल ; सहा पानटपरी जमा ;


भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा,महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान,गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत ता.२० रोजी कार्यवाही करण्यात आलेली असून ६ पानटपरी या जमा करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वृत्त असे की,भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा, महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश मिळाल्याने दिनांक 20/12/2024 रोजी पोलीस प्रशासन तसेच नगरपालीका प्रशासन अश्यांनी संयुक्तरीत्या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा, महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे एकुण 12 टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली असुन नगरपरिषद प्रशासनाकडुन 06 पानटपरी या जमा करण्यात आल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासनाकडुन भुसावळ शहरातील शाळा, महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान, गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे पान टपरी धारकांवर यापुढे देखील अश्याच प्रकारे वेळोवेळी मोहीम राबवुन कार्यवाही करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक जळगाव .महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, .उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन राहुल वाघ तसेच, कार्यकारी मुख्य अधिकारी भुसावळ नगरपरिषद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन तसेच नगरपरिषद प्रशासन अश्यांनी संयुक्तरीत्या केलेली आहे.