राहुल गांधींची खासदारकी रद्द करा-शिशिरजावळे. यांची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी.

भुसावळ – गुरुवारी सकाळी इंडिया ब्लॉक आणि भाजपचे खासदार संसदेत निदर्शने करत होते. शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा इंडिया ब्लॉक निषेध करत होता आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होता. आंबेडकरांवर काँग्रेसच्या वक्तव्याला भाजपचे खासदारही विरोध करत होते. यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार आमनेसामने आले. वृत्तानुसार, यानंतरच धक्काबुक्की सुरू झाली. ज्यामध्ये दोन खासदार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत महिला खासदारांनी सुद्धा राहुल गांधींवरही आरोप केले आहेत या धक्काबुक्कीच्या घटनेबाबत भारतीय जनता पार्टीतर्फे सुद्धा दिल्ली पोलीस विभागात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवारी सकाळी इंडिया ब्लॉक आणि भाजपचे खासदार संसदेत निदर्शने करत होते. शहा यांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याचा इंडिया ब्लॉक निषेध करत होता आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. आंबेडकरांवर काँग्रेसच्या वक्तव्याला भाजपचे खासदारही विरोध करत होते. यावेळी दोन्ही पक्षांचे खासदार आमनेसामने आले. वृत्तानुसार, यानंतरच धक्काबुक्की सुरू झाली.फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांना राहुल यांनी धक्काबुक्की केल्याने ते सारंगी यांच्या अंगावर पडले, असा आरोप आहे. राजपूत यांना राम मनोहर लोहिया यांच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे .राहुल गांधींनी भाजपच्या दोन खासदारांना धक्काबुक्की केली. त्यांचे रक्त काढले. तसेच. तसेच नागालँडमधील भाजपच्या खासदार फांगनोन यांनी देखील राहुल गांधीं यांचे विरुद्ध खंबीर आरोप करत त्यांच्या विरुद्ध राज्यसभेचे सभापतींकडे तक्रार केली आहे.
राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते असून संसदेच्या पवित्र सभागृह आणि त्याच्या आवारात अशा पद्धतीने दादागिरी करणे , गोंधळ घालून , धक्काबुक्की करत खासदारांना जखमी करण , मारहाण होणे हे अशोभनीय कृत्य आहे संसद ही शारीरिक प्रदर्शनाची जागा नाही. संसद हे कुस्तीचे व्यासपीठ नाही.

म्हणून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीनेराहुल गांधी यांची खासदारकी त्वरित रद्द करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी लोकसभेचेसभापती ओम बिर्ला यांचेकडे केली असल्याचं त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे