भुसावळ – वीज मीटर फॉल्टी असल्याने सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना सावदा विभागाच्या सहा.अभियंत्यांसह दोन लाईनवर यांच्यावर एसीबीने कारवाई केल्याने वीज कंपनीतील लाचखोरांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराचे वीज मीटर फॉल्टी असल्याने त्या बदल्यात सकारात्मक अहवाल देण्यासाठी 20 हजाारांची मागणी करीत तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना वीज कंपनीतील दोन लाईनमनसह सहाय्यक अभियंत्याला पकडण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाडळसे, ता.यावल येथे ही कारवाई करण्यात आली. जळगाव पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी कारवाईच्या वृत्ताला दुजोरा देत लवकरच सविस्तर माहिती कळवण्यात येईल, असे सांगितले.




