भुसावळातील तन्मय पाटीलने महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली

भुसावळ – राजस्थान पाली येथील मैदानावर पेसापोलो फेडरेशन आफ इंडिया आयोजित पंधरावी सबज्युनियर पेसापोलो नॅशनल चॅम्पियन स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यात सहभागी महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून भुसावळ येथील तन्मय आनंदा पाटील याने जबाबदारी पार पाडली. त्याच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाला या स्पर्धेत गोल्डमेडल मिळाले. या यशाबद्दल तन्मयचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .तन्मय हा येथील पत्रकार आनंदा लोटन पाटील, यांचे सुपुत्र आहेत .



