‘

भुसावळ –
राष्ट्रीय सेवा याेजना विभागाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभाव जपणारी पिढी निर्माण हाेण्यासाठी मदत हाेईल. गावागावात त्यातून समर्पित भावनेने काम करणारी लाेकचळवळ उभी राहिल, असा विश्वास किन्ही येथे सुरू असलेल्या काेटेचा महिला महाविद्यालयाच्या शिबिरात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
किन्ही येथील सर्वाेदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात काेटेचा महिला महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर आयाेजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी झाले. स्थानिक एज्युकेशन सोसायटी, किन्हीचे सचिव संजय नथ्थू चौधरी यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच नीलम सचिन सोनवणे, मुख्याध्यापक एम. एम. चौधरी, पर्यवेक्षिका प्रा. अर्चना झिंगरन, प्रा मीना चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. जान्हवी तळेगावकर होत्या. संजय चौधरी, एम. एम. चौधरी, उपप्राचार्य डॉ. जान्हवी तळेगावकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पाटील यांनी केले. आभार प्रा. श्वेता नागला यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. मनोज कुरकुरे, प्रा. संजय गावंडे, हरी पाटील, नितीन चौधरी व स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.


