रोटरी क्लब, इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी यांचा सयुंक्त समाजपयोगी उपक्रम :
भुसावळ – भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान हेच जीवनदान ह्या अनुषंगाने रोटरी क्लब चे सचिव अनील सहानी व सदस्य उमेश घुले, पुरुषोत्तम पटेल, सुधीर पाचपांडे, अनिकेत पाटिल,योगेश चौधरी यांच्या सह ३६ लोकानी रक्तदान करून समाजपयोगी उपक्रम राबवून आमदार संजयजी सावकारे यांचा वाढदिवस साजरा केला


यावेळी प्रोजेक्ट चेअरमन नितीन धांडे रोटरी रेलसिटी चे अध्यक्ष ॲड. विशाल शाह ,मीनाक्षी धांडे , अध्यक्ष इनरव्हील रेलसिटी,अनील सहानी सचिव रोटरी रेलसिटी व क्लब सदस्य विकास पाचपांडे, देवा वाणी,महेंद्र मांडे व रोटरी रेलसिटी व इनरव्हील सदस्य उपस्थित होते.



