भुसावळ – भुसावळ नजीकच्या शिवपूर-कन्हाळा येथील श्रीदत्त गिरनारी मठात दत्त जयंती उत्सव साेमवारपासून सुरू झाला. यानिमित्त मठात धार्मिक कार्यक्रम सुरू आहे .

यानिमित्त गुरूचरित्राच्या ३३ व्या अध्यायात श्री गुरूंनी आपल्या भक्तांना रुद्राक्षाचे महत्त्व विषद केले. त्यावर आधारित आरास आज साेमवार रोजी या मठात साकारण्यात आली. राज्यभरातील भाविक दर्शनासाठी येत असल्याची माहिती स्वामी ब्रह्मानंद यांनी दिली.


