आयशरच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू, रिक्षा चालक जखमी –

भुसावळ – भरधाव आयशर वाहनाने प्रवासी रिक्षाला दिलेल्या धडकेत बुलढाणा जिल्ह्यातील 62 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक जखमी झाला. हा अपघात दीपनगर उड्डाणपुलावर 5 नोव्हेंबर रोजी रात्री 7.30 वाजता घडला होता. याप्रकरणी आयशर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.ळ
रिक्षा चालक लखन गोविंद पटोने (35, रामदेवबाबा नगर, धरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी वरणगावकडून भुसावळकडे रिक्षा (एम.एच.19 सी.एफ.0566) ने येत असताना दीपनगर पुलावर भरधाव आयशर (एम.एच.19 सी.वाय.4833) ने जबर धडक दिली. या अपघातात रिक्षातील प्रवासी रमेश सारसर (62, उमाळी, ता.मलकापूर) यांचा मृत्यू झाला तर चालक लखन गोविंद पटोने व अंजली लखन पटोले (दोन्ही रा.धरणगाव) हे जखमी झाले. पटोने यांच्या फिर्यादीवरून आयशर चालक (नाव, गाव माहित नाही) याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ग्रेडेड उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.