भोळे महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न ;


भुसावळ – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकताच जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थी जागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थी विकास विभागाचे अंतर्गत रेड रिबन क्लब च्या माध्यमातून हा कार्यक्रम दोन सत्रात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक पहिल्या सत्रचे प्रमुख वक्ते म्हणून ट्रॉमा सेंटर भुसावळ मधील एड्स विषयक कार्य करणाऱ्या समिती चे सदस्य श्री दिनकर तायडे तर दुसऱ्या सत्राचे प्रमुख वक्ते म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्हा समन्वयक आणि भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ दयाघन राणे हे उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री दिनकर तायडे यांनी एड्स झाल्यावर घ्यावयाची खबरदारी स्पष्ट करून एड्स झालेल्या रुग्णावर बंदी घालणाऱ्या व्यक्तीवर कायदेशिर कारवाई करता येते. हे स्पष्ट केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना प्रा डॉ दयाघन राणे यांनी एड्स च्या उत्पत्तीची गृहितके सांगून एच आय व्हीं व्हायरस ची रचना आणि त्याची लागण झाल्यावर शरीरात होणाऱ्या घडामोडींची माहिती दिली. या वेळी एच आय व्ही चे मॉडेल विद्यार्थ्यांना दाखवून त्याची लागण होण्याची कारणे, लागण झाल्यावर दिसणारी लक्षणे या बद्दल विस्तृत माहिती दिली.
प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आणि घेतल्यानंतर ही आपले चारित्र्य शुद्ध ठेवण्याचे आवाहन केले. आपण सुरक्षित राहिलो तर समाज आणि सुरक्षित आणि निरामय राहील असे अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे हस्ते करण्यात आले, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा आर डी भोळे यांनी मा. प्राचार्य डॉ आर पी फालक यांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी विकास विभागाच्या महिला अधिकारी प्रा संगीता धर्माधिकारी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा अनिल सावळे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील श्री मेहेरे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा डॉ आर बी ढाके, प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा डॉ जी पी वाघुळदे प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ संजय बाविस्कर, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा संजय चौधरी, प्रा एस एस पाटील, प्रा निर्मला वानखेडे, प्रा श्रेया चौधरी, प्रा के व्ही धांडे, प्रा. गायत्री नेमाडे, प्रा जागृती सरोदे, प्रा ऐश्वर्या वासकर, प्रा आरती नवघरे, प्रा कामिनी चौधरी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.