देवघरा समोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग : संसारोपयोगी साहित्याची जळून झाली राख : लाखोंचे नुकसान ;

जामनेर –

शहरातील शास्त्री नगर भागातील बंद घराला घरातील देवघरा समोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागून संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली असून या आगी मुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तात्काळ आग आटोक्यात आणली.

सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहर शास्त्री नगर भागातील रहिवासी खुशालसिंग दावलसिंग पवार हे आपल्या कुटुंबा सोबत बाहेर गेले असता बंद घरातील

देव्हाऱ्या समोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग
संसारोपयोगी साहित्याची जळून झाली राख : लाखोंचे नुकसान

समोर लावलेल्या दिव्यामुळे घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले आहे. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे आजू बाजूच्या रहिवाश्यांनी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याने नागरिकांनी या घटनेची माहिती जामनेर नगर पालिकेच्या अग्नीशामक दलाला दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या काही मिनिटांत अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. खुशालसिंग पवार यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले असून पवार यांनी अंदाजे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे यावेळी सांगितले. संबधित विभागाने तात्काळ पंचनामा करून गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. असून या आगी मुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेत तात्काळ आग आटोक्यात आणली.

आजुबाजुच्या नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाची सविस्तर माहिती नगरपालिका प्रशासनास दिली. खुशालसिंग पवार यांच्या घराला लागलेल्या आगीत संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून राख झाले असून पवार यांनी अंदाजे लाखोंचे नुकसान झाले असल्याचे यावेळी सांगितले. संबधित विभागाने तात्काळ पंचनामा करून गरीब कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.