भुसावळ – जळगाव जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आर जी झांबरे माध्यमिक विद्यालय भुसावळ येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सदस्य एस एस अहिरे सर होते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटक म्हणून भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ चे चेअरमन संजय भालचंद्र पाटील उपस्थित होते.
भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे पी सपकाळे सर यांनी स्पर्धेबाबत पाळावयाचे नियम व विशेष सूचना याबाबत मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एस अहिरे सर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले
वक्तृत्व स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या 5वी ते 7वी या प्रथम गटात प्रथम क्रमांक गुंजन संदीप घुले ज्ञानज्योती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खडके द्वितीय क्रमांक मोक्षदा किरण कचरे के नारखेडे विद्यालय भुसावळ तृतीय क्रमांक तेजश्री सुरेश शिरसाळे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव 8वी ते 10वी या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक मीनल अजय राणे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव द्वितीय क्रमांक रेणुका जितेंद्र क्षीरसागर के नारखेडे विद्यालय भुसावळ तृतीय क्रमांक देवेश श्रीकृष्ण कंकरे दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव व 11वी ते 12वी या तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक पूर्वा सचिन बेंडाळे ज्ञानज्योती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय खडके द्वितीय क्रमांक कोमल किशोर बोरनारे के नारखेडे विद्यालय भुसावळ तृतीय क्रमांक रिद्धी रवींद्र बाविस्कर के नारखेडे विद्यालय भुसावळ यांना घवघवीत यश मिळाले
यावेळी सहभागी सर्व स्पर्धकांना मुख्याध्यापक संघाच्या वतीने पेन भेट म्हणून देण्यात आला व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली
परीक्षक म्हणून राहुल केशव चौधरी श्रीमती हर्षाली दिलीप गाढे सौ खुशबू दीपक चौधरी सौ हर्षा किरण जैन सौ गायत्री सुरज सरोदे श्रीमती स्वाती रामदास महाजन श्रीमती कविता मुरलीधर पाटील सौ निलांबरी नरेंद्र झांबरे श्री गोकुळ गणपतसिंग राजपूत यांनी काम पाहिले
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जे पी सपकाळे दिपनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक जे बी पाटील श्रीकृष्ण हायस्कूल शिंदीचे मुख्याध्यापक भास्कर वारके मांडवेदिगर हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन भालेराव आर जी झांबरे विद्यालयाचे पर्यवेक्षक शशिकांत बावस्कर सातपुडा शिक्षण संस्थेचे सदस्य जितेंद्र चौधरी सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी के नारखेडे विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय एन झोपे सर हे हजर होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजी झांबरे विद्यालयाचे शिक्षक मनिष गुरचळ सर यांनी केले व आभार दिपनगर शाळेचे मुख्याध्यापक जे बी पाटील यांनी मानले.




