तुमचे सरकार बसले की उपोषणाची तारीख जाहीर करणार : मनोज जरांगे पाटील –

जालना – आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यांचे सरकार आले आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन सुद्धा केले पाहिजे आणि ते संस्कार आमच्या मराठ्यांवर आहेत. पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही मराठे तुम्हाला टाळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. सरकार बसले की उपोषणाची तारीख जाहीर करणार, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

निवडून आलेल्यामांगे मराठा फॅक्टर
मनोज जरांगे पाटील म्हणाले, एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावे तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावे. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला. जेवढे लोक निवडून आलेत ना त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे, असे जरांगे म्हणाले. एखाद्या आमदाराने म्हणावे की, तो मराठ्यांच्या जिवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल, तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता, असा सवाल देखील त्यांनी केला.

मग जरांगे फॅक्टर फेल कसा
जरांगे म्हणाले, मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही. हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेले आहे. आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्या सारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दीत नाही जायचे आणि माझेच आहे म्हणायचे. आमच्या फॅक्टरमुळेच सरकार आले. यांना दुसर्‍याचे पाळणे लोटायची सवय आहे, असेही ते म्हणाले.