नाशिक रेल्वे स्टेशन येथे “एक स्टेशन एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थानिक हस्तकला, विशेष उत्पादने आणि ग्रामीण भागातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक उत्पादकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून दिला जात आहे.

रेल्वे स्थानकावरील या प्रदर्शनीत नाशिक आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक उत्पादकांचे विविध पारंपारिक आणि विशिष्ट उत्पादने
यात प्रामुख्याने स्थानिक हातमाग वस्त्र, पारंपारिक हस्तकला उत्पादने पाहायला मिळतील.
या प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय पातळीवर पोहोच देण्याची संधी मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘एक स्टेशन, एक उत्पाद’ या योजनेच्या अंतर्गत या प्रकारच्या प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते, ज्यामुळे स्थानिक उत्पादक आणि हस्तकलाकारांना त्यांच्या उत्पादनांना व्यापक ग्राहकवर्गासमोर मांडता येईल.
नाशिक रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


