भुसावळातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची आद्विती श्रीवास्तवला राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक :

भुसावळ : शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीची विद्यार्थिनी आद्विती श्रीवास्तव हिने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय बॉक्सींग स्पर्धेत रजत पदक मिळवत शहराचा नावलौकीक वाढवला. 10 ते 14 सप्टेंबरदरम्यान 53 वी केंद्रीय विद्यालयाद्वारा आयोजित नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशीप झांशी येथे झाली. त्यात आद्विती श्रीवास्तव या खेळाडूने अद्वितीय कलेचे प्रदर्शन करीत रजत पदक मिळवले.

या खेळाडूला छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक नरेंद्र अरुण मोरे यांनी मार्गदर्शन केले. आद्वितीचे प्राचार्य डी.एस.नंदेश्वर, हेड मास्टर सुरेश नरहिरे व शाहू महाराज बॉक्सिंग अकादमीच्या पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.