भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर भागातील न्यु चैतन्य मंडळाच्या गणरायाची आरती बाजारपेठे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली . यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच मंडळाचे पराग ब-हाटे , अजय चौधरी , मंदार बागुल , सनी चौधरी , विजय चौधरी , शुभम तळेले , आकाश कोळी , गौरव तळेले , यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी मंडळातर्फे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांचा सत्कार करण्यात आला .


विविध स्पर्धा संपन्न :
दरम्यान आरती नंतर न्यु चैतन्य मंडळाच्यावतीने आपले सणोत्सव साजरा करण्याचा उद्देश , संस्कार व संस्कृतीचे जतन व्हावे समाजप्रबोधन व्हावे म्हणून सामाजिक उपक्रम अंतर्गत विविध स्पर्धा घेण्यात आल्या .या स्पर्धेत लिबू चमचा , संगीत खुर्ची , स्मरणशक्ती , श्लोक पठण , यासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या . स्पर्धेत परिसरातील चिमरड्यांसह , विद्यार्थी , महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या . स्पर्धा यशस्वीतेसाठी सौ मनीषा ब-हाटे , सौ मनीषा चौधरी , सौ मोहिनी चौधरी , सानिका ब-हाटे , उज्वला बागुल , मंगला तळेले , मोना ब-हाटे , यांचेसह न्यु चैतन्य मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .


