भुसावळ – येथील वरणगांव रोडवरील एम.आय.डि.सी. परिसरात भुसावळ बाजारपेठ पोलिसांना एकास अटक केल्याची घटना आज १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली .

शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना (ता.१४) रोजी साडे पाच वाजेला गोपनीय माहिती मिळाली की,रेकॉड वरील गुन्हेगार हरीश राहुल उजलेकर राहणार वरणगांव ता. भुसावळ हा गुन्हा करण्याचे उद्देशाने वरणगांव रोडवरील एम.आय.डि.सी. परिसरातील सदगुरु इंडस्ट्रीट जवळील बांधकाम चालु असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ येणार आहे. यावरून पो नि राहुल वाघ यांनी एका पथकास घटनास्थळी रवाना केले . यावेळी पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, विजय नेरकर,निलेश चौधरी,महेश चौधरी,राहुल वानखेडे,भुषण चोधरी,प्रशांत परदेशी,जावेद शहा यांच्या पथकाने सापळा रचून संशयीत आरोपी हरीश राहुल उजलेकर राहणार वरणगांव ता. भुसावळ यास ताब्यात घेतले .त्याच्याअंगझडतीत एक लोखंडी गावठी पिस्टल दोन जिवंत काडतुस असे एकूण 17,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक अशोख नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्ना खाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव,विजय नेरकर,निलेश चौधरी,महेश चौधरी, राहुल वानखेडे,भूषण चौधरी,प्रशांत परदेशी ,जावेद शहा अशांनी केली आहे.


