भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अलंकरण समारोह दि १३ रोजी संपन्न झाला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना कॅप्टन व व्हाईस कॅप्टन बनविण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना बॅच शासित देण्यात आले , शाळेचे हेड बॉय व हेड गर्ल सिलेक्शन करण्यात आले. प्रसंगी चार हाऊस नेमण्यात आले.वेगवेगळे क्लब बनवण्यात आले.
यात अलबर्ट इनस्टेन हाऊस याचे हेड कॅप्टन कय्युम शेख,आर्यभट्ट हाऊसचे हेड कॅप्टन प्रतिभा काकडे,कल्पना चावला हाऊस चे हेड कॅप्टन वर्षा काळे तर होमीभाभा हाऊस चे हेड कॅप्टन गौरी प्रभुदेसाई यांना करण्यात आले.
कन्टीजंट लीडर ऍनेट मॅथ्यू यांना करण्यात आले. मुलांसह शिक्षकांचीही हेड लीडर म्हणून नेमणूक करण्यात आली यात
हेडबॉय अमित झनके,हेड गर्ल धनश्री नेहते,असिस्टंट हेडबॉय पवित्र यादव,असिस्टंट हेड गर्ल अनुष्का नाफडे यांची नेमणूक करण्यात आली.


यावेळी अकॅडमी कॅप्टन , डिसिप्लिन कॅप्टन,इव्हेंट मॅनेजमेंट कॅप्टन,वॉलेंटियर्स कॅप्टन,प्रिफेटस् कॅप्टन,स्पोर्ट कॅप्टन,योगा कॅप्टन,भारत स्काऊट अँड गाईड कॅप्टन , ज्युनियर आर्टीस्ट,ज्युनियर म्युझी शियन अशी विवीध पदे विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यावेळी व्हॉइस प्रिन्सिपल श्रद्धाली घुले,मनप्रीत कौर,ऍनेट मॅथ्यू ,हर्षला पाटील,प्रतिभा काकडे,गौरी प्रभू देसाई,कयूम शेख,विजय संकत,अनिता कोळी,अर्जुन सणस,नितीन अडकमोल,महेंद्र सूर्यवंशी,वृषाली गाडगीळ,अकबर खान,सोनाली मुजुमदार,राजेश टंडन आदी उपस्थित होते. या प्रसंगी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोफीया पीबॉडी,स्वरदा केऱ्हाळकर , गौरव झोपे यांनी केले.तर आभार श्रद्धाली घुले यांनी मानले
— – – – – – – – –

फोटो कॅप्शन – भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अलंकरण समारोह प्रसंगी विद्यार्थ्यांना बॅचेस लावतांना प्रिन्सिपल निना कटलर.



