नाहाटा महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न :


भुसावळ – येथील भुसावळ कला,विज्ञान आणि पु .ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यलय भुसावळ येथे विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यात प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.भुसावळ शहरातील नामांकित डॉक्टरांनी यात सहभाग नोंदविला.यात स्त्रीरोग तज्ञ,दंत्य रोग तज्ञ,जनरल फिजिशियन व इतर क्षेत्रातील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली.डॉ केतन महाजन,डॉ अभय जावळे,डॉ विद्याधर भोळे,डॉ चैताली झांबरे,डॉ किरण किरंगे,डॉ चारुलता पाटील इ वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेल्या डॉक्टरांनी तपासणी केली.
वैद्यकीय तपासणी शिबिराच्या पहिल्या दिवशी उपप्राचार्य प्रा डॉ बी एच बऱ्हाटे यांनी उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत केले.तसेच विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी संपन्न झाली.शिबिराच्या दुसऱ्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयक समस्यांचे योग्य निराकरण डॉक्टरांकडून करण्यात आले.
वैद्यकीय तपासणी शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ एस व्ही पाटील,उपप्राचार्य प्रा डॉ बी एच बऱ्हाटे यांनी मार्गदर्शन केले.वैद्यकीय शिबिरासाठी डॉ स्मिता चौधरी प्रा दीपक पाटील,डॉ एसटी धूम,डॉ पी ए अहिरे,डॉ कल्याणसिंग पाटील ,डॉ व्ही एन महिरे,डॉ प्रफुल्ल इंगोले,डॉ स्वाती फालक,डॉ सचिन येवले,डॉ पुरुषोत्तम महाजन,डॉ कोमल सरोदे ,डॉ दीनानाथ पाठक,डॉ अजय क्षीरसागर,डॉ महेंद्र ह्यालिंगें , गिरीश आव्हाड , गणेश ठाकूर इ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले