भुसावळ : गेल्या शनिवारी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होताच मंगळवारी ज्येष्ठा गौरींचाही सोन पावलांनी घरोघरी प्रवेश झाल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले विशेष करून गृहिणींची लगबग वाढल्याचे दिसून आले.

आज ज्येष्ठा गौरींच्या पूजनार्थ जाई-जुई. शेवंती, जास्वंदी, मोगरा, गोकर्ण,करदळी, चाफा आदी फुलांसह आघर्डा, शमी पत्री दुर्वासह नैवेद्यासाठी सोळा भाज्या ज्यात पडवळ, आंबटचुका, चाकी, अंबाडी, गंगाफळ, गिलके, दोडके, भोपळा, टमाटे, तोडले, चवळी, गवार, वाल, श्रावणघेवडा, पोकळा, ढेमसे यासह अनारसे, करंजी, सांजोरी, मोदक, लाडू, पुरणपोळी, चटण्या कोशिंबीर तसेच अंबील व पंचामृताचा समावेश असतो. उद्या गौरींचे विसर्जन केले जाणार आहे.
बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांनी गौरी पूजनानिमित्त आपआपल्या गावी हजेरी लावल्याने घरातील वडिलधाऱ्या मंडळींचा उत्साह द्विगुणीत झालेला दिसून आला.
फोटो ओळ
भुसावळ : येथील सहकार नगर नामदेव अपार्टमेंट मधील श्रीराम कुळकर्णी यांच्या घरी केलेली ज्येष्ठा गौरींची आकर्षक आरास,


