:

भुसावळ : गेल्या शनिवारी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन होताच आज मंगळवारी श्री महालक्ष्मी (ज्येष्ठा गौरीं) चेही सोन पाऊलांनी आगमन झाले घरोघरी अत्यंत भक्तीमय वातावरणात स्थापना झाली . यानिमित्ताने विशेष करून गृहिणींची लगबग वाढल्याचे दिसून आले.
महालक्ष्मी ज्येष्ठा गौरींच्या पूजनार्थ जाई-जुई. शेवंती, जास्वंदी, मोगरा, गोकर्ण,करदळी, चाफा आदी फुलांसह आघर्डा, शमी पत्री दुर्वासह फुलहार अर्पण केले जातात तर दुसऱ्या दिवशी नैवद्यासाठी पुरणावरणासह सोळा भाज्या ज्यात पडवळ, आंबटचुका, चाकी, अंबाडी, गंगाफळ, गिलके, दोडके, भोपळा, टमाटे, तोडले, चवळी, गवार, वाल, श्रावणघेवडा, शेपू , पोकळा, ढेमसे यासह अनारसे, करंजी, सांजोरी, मोदक, लाडू, शेव , चिवडा ,चकली , , चटण्या कोशिंबीर तसेच अंबील व पंचामृताचा समावेश असतो. सुवासिनी हळदी कुंकू साजरे करून रात्री जागरण कथा कहाणी करून व्रत करतात. तर तिसऱ्या दिवशी गुरुवार रोजी गौरीला मुरड कानवले व दहिभाताचा नैवद्य केला जातो गौरींचे विसर्जन केले जाणार आहे. दररोज दिप आरती , सह घरात धुपाचे सुवासाचा गंध दरवळत असतो . आधीच बाप्पाचे आगमन व नंतर जेष्ठांगौरीचे आगमन यानिमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येतात त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते .
तर बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांनी गौरी पूजनानिमित्त आपआपल्या गावी हजेरी लावल्याने घरातील वडिलधाऱ्या मंडळींचा उत्साह द्विगुणीत झालेला दिसून आला.
फोटो कॅप्शन
भुसावळ : येथील विठ्ठल मंदिर वॉर्ड भागातील रहिवासी अनिल बागुल यांच्या घरी केलेली श्री महालक्ष्मी ( गौरींची ) आकर्षक आरास,


