भुसावळ : श्री गजानन महाराज संजिवन समाधी ग्रहण तिथी ऋषीपंचमीनिमित्त जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरात श्रीं ची पूजा स.८:३० ते १०:३० पर्यंत पार पडली. तद्नंतर प्रसाद वाटपास प्रारंभ झाला.
८ रोजी स. ६ वाजेपासून विजयग्रंथ पारायण वाचनास प्रारंभ झाला . यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय हाेती. प्रसंगी भाविकांनी प्रसादासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व पाेळ्या, बुंदिचे लाडू, चनादाळ, गहू, तेल मंदिरात देवून महाप्रसादास सहकार्य केले




