भुसावळ – ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हेच ज्ञान शिक्षक निरपेक्षपणे आपल्या विद्यार्थ्यांना देतात. उत्तम समाज घडविण्यासाठी जे वेगवेगळे घटक जरूरी आहेत जसे राजकारणी, सैनिक, पोलिस, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक आणि शिक्षक हे सारे शिक्षकच तयार करतात त्यामुळे समाजघडण तसेच देशाच्या उन्नतीसाठी शिक्षकांचा वाटा सिंहाचा आहे. आज ५ सप्टेंबर २०२४ रोजी शिक्षकदिनी शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी येथील सक्षम नारी फाउंडेशन तर्फे या शिक्षकांचा सन्मान करून गौरविण्यात आले .



यामध्ये अनिल मोरे , सेंट्रल रेल्वे स्कूल डॉ. सौ भाग्यश्री भंगाळे ,( नाहाटा कॉलेज ) , समाधान जाधव सर (,जिल्हा परिषद शाळा, शिंदि ) , सौ सोनाली शैलेंद्र वासकर (अहिल्या देवी कन्या विद्यालय ) , शैलेंद्र धनजी वासकर सर(के नारखेडे विद्यालय) निलोफर काझी ,( गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल)या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सन्मानचिन्ह आणि झाडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी सक्षम नारी फाउंडेशन अध्यक्ष डॉ सुवर्णा गाडेकर, सुनिता जोशी, डॉ वैशाली रामवंशी, शीतल भालेराव व सुनंदा डांगे उपस्थित होते



