दीपनगर केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची बदली -मुख्यालयातील उपमुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणेंकडे पदभार

भुसावळ – दीपनगर औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांची उरण प्रकल्पात तडकाफडकी बदली करण्यात आली तर त्यांच्या रिक्त जागेवर उरण कंद्रातील उपमुख्य व प्रभारी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांची बदली झाली आहे. यासोबतच आव्हाड यांच्याकडे असलेला 660 मेगावॅट प्रकल्पाचा पदभार काढून त्या जागी मुंबई मुख्यालयातील मुख्य अभियंता शशांक चव्हाण यांच्याकडे बदली करून देण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही नूतन अधिकार्‍यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.