भुसावळ: भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दावते इस्लामी हिंद भुसावळ या सामाजिक व धार्मिक संस्थेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये मुलांची तिरंगा रॅली, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचा समावेश आहे शोएब अत्तारी यांनी माहिती देतांना सांगितले की सकाळी 10:30 वाजता अयान टॉवर अमरदीप चौक पासून मदरसतुल मदीनाच्या मुलांची तिरंगा रॅली व वृक्षदिंडी रॅली काढण्यात येणार असून, या रॅलीद्वारे सर्वसामान्यांना देशभक्तीचा संदेश सोबतच वृक्षरोपण साठी जागृत करण्यात येणार आहे रैलीचा समापन रझा टॉवर मोहम्मद अली रोड खडका रोड येथे होऊन तिथे भारताची उन्नती व विश्वशांतीसाठी प्रार्थना तसेच मदरसेचे लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे सोबतच सुन्नी जामा मशिदीजवळील जाम मोहल्ला येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत दावते इस्लामी हिंदचे सामाजिक विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दावत इस्लामी हिंदचे जिल्हाध्यक्ष जुबेर अत्तारी, शहराध्यक्ष शोएब अत्तारी, जीएनआरएफचे जिल्हाध्यक्ष रफिक रोशन कादरी यांनी या शिबिरात रक्तदातांनी मोठ्या संख्येने येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.



