भुसावळ-बडनेरा मार्गावरील 12.29 किलोमीटरच्या जलंब- शेगांव विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा यशस्वीरित्या कार्यान्वित


भुसावळ दिनांक १२ – भुसावळ-बडनेरा मार्गावरील 12.29 किलोमीटरच्या जलंब- शेगांव विभागात स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा यशस्वीरित्या कार्यान्वित झाली
भुसावळ-बडनेरा विभागातील जलंब आणि शेगांव स्टेशन (12.29 किमी) दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कामाच्या अंमलबजावणीसाठी, 4 दिवस पूर्व नॉन इंटरलॉकिंग आणि 1 दिवस नॉन इंटरलॉकिंग कार्य 2 तास 30 मिनिटे अप आणि डाऊन मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक चे नियोजन करण्यात आले होते. हे काम दिनांक १०.०८.२०२४ रोजी यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहे.
हे काम सुरू झाल्यानंतर, एक परिपूर्ण ब्लॉक विभाग ( जलंब आणि शेगांव स्टेशन दरम्यान) स्वयंचलित ब्लॉक विभागात रूपांतरित झाला आहे यामध्ये 16 स्वयंचलित सिग्नल आणि 4 सेमीऑटोमॅटिक सिग्नल आहेत.
स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली म्हणजे वाहतुकीच्या घनतेनुसार अंदाजे प्रत्येक 1 किमी अंतरावर किंवा 400 मीटर अंतरावर सिग्नल लावणे, जेणेकरून जास्त गाड्या चालवता येतील. एक ट्रेन एकदा सिग्नल पास केल्यानंतर, ट्रेन पुढच्या स्टेशनवर पोहोचण्याआधीच, त्याच्या मागून दुसरी ट्रेन पाठवली जाऊ शकते. आणि या सिस्टीममध्ये सिग्नल्सची संख्या वाढवली असल्याने जास्त गाड्या पाठवता येतील.
आता या स्थानकांदरम्यान, विभागांमध्ये प्रत्येक 1 किमी अंतरावर सिग्नल बसवले आहेत. अशा प्रकारे प्रत्येक 1 किमी अंतरावर सेक्शनमध्ये 1 ट्रेन धावू शकते. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल आणि त्यात जास्त गाड्या चालवता येतील