भडगांव
कजगाव तालुका भडगाव येथे मलकापूर हुन विठ्ठलवाडी च्या दिशेने जाणारी बस क्रमांक एम . एस.20 बी. एल 3296 या चालत्या एस टी बसचे अचानक मागचे चाक फसले व दुसरे टायर देखील फुटले असता बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाताजाता वाचल्याने बस मधील 80 प्रवाशी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र बस चालकाने वेळेतच बस कंट्रोल केल्याने पुढील अनर्थ टळला प्रवाशानी बस चालकाची यावेळी आभार मानले

मात्र लांब पल्ल्याची जाणारी बसचे टायरच निघाले कसे बस निघताना एसटी बस ही डेपो मधले मेकॅनिकल यांनी चेक केली नसेल का अशी देखील शंका प्रवाशांमध्ये व्यक्त होत होती हलगर्जीपणा मुळे या ठिकाणी मोठा अपघात झाला असता, काही वेळाने वाहक चालकांनी भडगांव कडून येणाऱ्या बस मध्ये पुढील प्रवासासाठी या प्रवाशांना मार्गस्थ केले .



