भुसावळ – भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना यांच्या वतीने येत्या ५ ऑगस्ट रोजी ‘ई-पोस मशीन जमा करो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन तालुका पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना बुधवारी ३१ जुलै रोजी देण्यात आले.

तहसीलदार निता लबडे यांच्याशी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट घेऊन ई-पोस मशीन अडचणी संदर्भात चर्चा केली. त्यानंतर पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे की, राज्यात साधारण ५२ हजार स्वस्त धान्य दुकानदार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणानंतर 2018 पासून ई पोस् मशीनद्वारे धान्य वितरण करत आहेत. परंतु मागील दोन महिन्यांपासून ई पोस मशीन वर धान्य वितरण करताना सातत्याने होणारे सर्वर डाऊन या प्रकारच्या येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे धान्य वितरण करता येत नाही आहे. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना आणि मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना धान्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य साठा उपलब्ध असून देखील धान्य वितरण करू शकत नाही आहे. याबाबत तालुका स्तरापासून जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर अनेक वेळा तक्रारी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारे सकारात्मक उपाय योजना न झाल्यामुळे येत्या ५ ऑगस्ट रोजी स्वस्त धान्य दुकानदार यांनी तहसील कार्यालयात ई-पोस मशीन जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
जुलै महिन्याचे धान्य ऑगस्ट महिन्यात कॅरी फॉरवर्ड वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी किंवा आजच पर्यायी व्यवस्था लाभार्थी वंचित राहू नये म्हणून ऑफ लाइन धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, जळगाव जिल्हा सचिव सुनील अंभोरे, तालुकाध्यक्ष महेंद्र सपकाळे, कैलास उपाध्याय, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर पवार, शहराध्यक्ष आरिफ मिर्झा, कार्याध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, सचिव यशवंत बनसोडे, टीना धांडे, आरती जोहरी, लक्ष्मी सुरवाडे अनिता आंबेकर, शांताराम इंगळे, पराग वाणी, विजय मेढे, दत्ता पाटील, संगीता पाटील, राहुल वंजारी, नितीन जैन, संतोष साळवे, धीरज तायडे, अल्ताफ पटेल, संघरत्न सपकाळे, मोहम्मद गवळी, रहीम गवळी, मनोज घोडेश्वर, उमाकांत शर्मा, देविदास जोहरे, अशोक प्रधान, भगवान नन्नवरे आदी स्वस्त धान्य दुकानदार यावेळी उपस्थित होते.


