महाराष्ट्र वीज कामगारांनी दिले केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंना निवेदन: आंदोलनाच्या माहितीसह विविध समस्यांवर केली चर्चा

भुसावळ

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेवून महाराष्ट्रात तिन्ही विज कंपनीतील अधिकारी , कर्मचारी यांचे पगारवाढ व इतर मागणीसाठी सुरु असलेले आंदोलनाची संपूर्ण माहीती देवून चर्चा केली.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, भुसावळ निर्मिती झोनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकित रावेर लोकसभेमधुन निवडुन आलेल्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेतली. संघटनेतर्फे त्यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सध्या सपूर्ण महाराष्ट्रात तिन्ही विज कंपनीतील अधिकारी , कर्मचारी यांचे पगारवाढ व इतर मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन यांची संपूर्ण माहीती दिली. तसेच प्रमुख सहा संघटना महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समिती यांनी ऊर्जामंत्री तथा तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांना केलेले पत्रव्यवहार यांची प्रत दिली. तसेच निर्मीती कंपनीत सुरु असलेल्या प्रश्नाबाबत चर्चा केली. याप्रसंगी निर्मिती विभागाचे केंद्रीय सचिव अनंत जाधव, सहसंघटनमंत्री संजय आमोदकर, जिल्हा प्रभारी डि. के. झासकर, झोन कोषाध्यक्ष पंकज वाणी, सर्कल अध्यक्ष बादल तायडे आदी उपस्थित होते.