मध्य रेल्वेच्या १५ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार :

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करन यादव यांनी दि. ०२.०७.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई विभागातील ५, भुसावळ विभागातील ७, नागपूर विभागातील १, पुणे विभागातील १ आणि सोलापूर विभागातील १ अशा १५ मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सत्कार केला.

ड्युटी दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन ऑपरेशन्समध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यात त्यांनी दिलेले योगदान, अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान या बद्दल हे पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रूपये २०००/- रोख असतात.

मुंबई विभाग

१. श्री मंटू कुमार, ट्रॅक मॅनटेनर/अभियांत्रिकी, इगतपुरी, दि. ०९/०६/२०२४ रोजी रात्री १०.४९ वाजता, अप लाईनच्या 121/8-121/9 किलोमीटर दरम्यान एक खडक पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ ट्रेनच्या दिशेने ट्रॅकचे संरक्षण केले आणि सर्व संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा खडक हटवून ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

२. श्री मुसाफिर कुमार, ट्रॅक मॅनटेनर/अभियांत्रिकी, इगतपुरी, यांनी दि. १०/०६/२०२४ रोजी दुपारी ०१.०५ वाजता, अप लाईनच्या 130/7-130/9 किलोमीटर दरम्यान दरड पडलेली पाहिला. त्यांनी तात्काळ ट्रेनच्या दिशेने ट्रॅकचे संरक्षण केले आणि सर्व संबंधितांना माहिती दिली. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरड साफ करून ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित केला. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे संभाव्य अपघात टळला.

३. श्री रूप कुमार, किमॅन/ट्रॅफिक, भिवपुरी यांना दि. २९/०५/२०२४ रोजी गेटमनकडून माहिती मिळाली की बीटीपीएन वॅगनला आग लागली आहे. त्यांनी थांबण्याचा इशारा दाखवून भिवपुरी स्थानकावर ट्रेन थांबवली आणि अग्निशामक यंत्राच्या साह्याने आग विझवली. त्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अपघात टळला.

४. श्री सोमनाथ, फिटर/मेकॅनिकल, इगतपुरी, दि. २२/०५/२०२४ रोजी मालगाडीचा ब्रेक पॉवर तपासत असताना असे लक्षात आले की वॅगनचे स्टील पॅनल सरकले आहे आणि बाजूच्या पॅनेलला स्पर्श करत आहे, जे रहदारीसाठी असुरक्षित आहे. सदर वॅगन जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

५. श्री जितेंद्र, एमसीएम/मेकॅनिकल, वाडीबंदर, दि. १२/०५/२०२४ रोजी, ट्रेन क्रमांक 12289 चा खालील गियर तपासत असताना, त्यांना एका डब्याच्या चाकाचा फ्लँज तुटलेला दिसला. त्यांनी तो कोच सिझ (जप्त) केला. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

भुसावळ विभाग

६. भगवान भीमा, ट्रॅक मेंटेनर/अभियांत्रिकी, घोटी, दि. १०/०६/२०२४ रोजी रात्रीच्या गस्तीदरम्यान, त्यांना रात्री १०.१५ वाजता १३९/४ किलोमीटरवर वेल्डला तडा गेलेला दिसला. त्यांनी तातडीने कारवाई करून सर्व संबंधितांना कळवून ट्रॅकचे संरक्षण केले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

७. श्री गोविंद किशोर शर्मा, ट्रॅक मेंटेनर/अभियांत्रिकी, नवी अमरावती हे दि. १९/०५/२०२४ रोजी कामाच्या दरम्यान, एका मालगाडीच्या वॅगनमधून आवाज येत असल्याचे ऐकून त्यांनी तात्काळ स्टेशन मास्टर/नवी अमरावती यांना कळवले. ट्रेन थांबवून तपासणी केली असता ६५ मिमीचा फ्लॅट टायर सापडला. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे रेल्वेचे नुकसान टळले.

८. श्री गजानन वानखेडे, गेटमन/इंजिनीअरिंग, बोरगाव हे दि. २९/०५/२०२४ रोजी गेट क्र. ४४ येथे कर्तव्यावर असताना त्यांना जाणाऱ्या मालगाडीच्या वॅगनमध्ये धुरा दिसला. त्यांनी स्टेशन मास्तर/बोरगाव यांना माहिती दिली. बोरगाव स्थानकात गाडी थांबवून पुढील कारवाई करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

९. दिलीप गुलाब, टेक्निशियन/मेकॅनिकल, खंडवा हे दि. ३१/०५/२०२४ रोजी खंडवा स्थानकावर ट्रेन क्रमांक 12150 च्या डब्यात चाचणी दरम्यान एक हॉट एक्सल निदर्शनास आले आणि तपासल्यावर तापमान ८०० सेंटीग्रेड असल्याचे आढळले. त्याच्या कार्यक्षमतेमुळे आणि सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

१०. श्री मुकेश कुमार पंडित, तंत्रज्ञ/मेकॅनिकल, भुसावळ हे दि. १९/०५/२०२४ रोजी भुसावळ यार्ड येथे चाचणी सुरू असताना मालगाडीची वॅगन डावीकडे झुकलेली दिसली. तातडीने सर्व संबंधितांना कळविण्यात आले. तपासात असे आढळून आले की वॅगनवर भरलेले कॉइलचे बंडल दुसऱ्या बाजूला सरकले असून सुरक्षित पट्ट्याही तुटल्या आहेत. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे रेल्वेचे नुकसान होण्यापासून वाचले.

११. श्री एस व्ही माहूरकर, लोको पायलट (गुड्स)/इलेक्ट्रिकल, भुसावळ हे दि. १३/०५/२०२४ रोजी एक मालगाडी चालवत असताना, नायडोंगरी स्थानकाच्या लूप लाईनवरून सुरू झाल्यानंतर, त्यांना पुढे असलेल्या एका भागात पोकळी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ट्रेन थांबवून सर्व संबंधितांना माहिती दिली व नंतर पॉइंट क्लॅम्प करून ट्रेन सोडण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

१२. आनंद सागर, सहाय्यक लोको पायलट/इलेक्ट्रिकल, भुसावळ, दि. २६/०५/२०२४ रोजी वडोदरा- मलकापूर विभागात जोरदार वादळामुळे मालगाडीचा वेग नियंत्रित करण्यात आला. त्याने पुढे पाहिले की, एका खांबाच्या ओएचई चा दर्शक भाग लटकलेला होता आणि तिथे एक झाड रुळावर पडले होते. त्याने लगेच ट्रेन थांबवली. सर्व संबंधितांना कळवले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

नागपूर विभाग
१३. अहफाज खान, ESM/S&T, सेवाग्राम, दि. १६/०६/२०२४ रोजी सकाळी ०३.२५ वाजता, सेवाग्राम स्टेशन रिले रूमच्या शेजारी असलेल्या फलाटावर एका स्टॉलला आग लागल्याचे पाहून, त्यांच्यामार्फत ती विझवण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात आली. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

पुणे विभाग
१४. श्री राजेश कुमार, ट्रॅक मेंटेनर/अभियांत्रिकी, कान्हेगाव हे दि. १९/०६/२०२४ रोजी पॉइंट क्र. १०१ अ. येथे स्टॉक रेलमध्ये तडा गेलेला दिसला. कान्हेगाव आवारातील त्यांनी तातडीने कारवाई करत इतर गँगमनच्या मदतीने ट्रॅक वाहतुकीसाठी सुरक्षित केला. सर्व संबंधितांना कळविण्यात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला.

सोलापूर विभाग
१५. श्री विलास ठाकूर, टेक्निशियन/इलेक्ट्रिकल, उस्मानाबाद, यांना दि. ०६/०५/२०२४ रोजी कळंब रोड सबस्टेशनच्या दोन्ही ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा बिघडल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तपासणी केल्यानंतर त्यांना एसी वितरण पॅनलमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने बिघाड दुरुस्त करून सामान्य वाहतूक सुरू केली. त्यांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे रेल्वेचे मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकले.

महाव्यवस्थापकांनी आपल्या भाषणात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कर्तव्याप्रती सतर्कता आणि समर्पणाबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, अशा सतर्कता आणि शौर्याने इतरांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.

प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, एम एस उप्पल; प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, एस एस गुप्ता; प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथूर; प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, सुनील कुमार; यावेळी प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता धरमवीर मीना उपस्थित होते.