भुसावळात ब्राह्मण संघाची 23 जून रोजी सर्वसाधारण सभा


भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या सभासदांची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार, दि. 23 जून रोजी सायंकाळी 4 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, चिटणीसांच्या व मागील वर्षांचे ताळेबंद व लेखापरीक्षकांचा अहवालास मंजूरी, लेखापरीक्षकांची नेमणूक, ब्राह्मण संघाच्या शतक महोत्सवी वर्षात घेण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमाविषयी सूचना व त्यासाठी विविध समित्यांचे गठन करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. तरी संस्थेच्या सर्व सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष व समस्त कार्यकारिणीने केले आहे