भुसावळच्या चोरट्याने अमळनेरात व्यापार्‍यासह चौघांच्या खिशातून 64 हजार रुपये लांबवले : पोलिसात गुन्हा नोंद –

अमळनेर : अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकातून एका व्यापारासह इतर चार जणांच्या खिशातून 64 हजारांची रोकड लांबवण्यात आली. ही घटना बुधवार, 12 जून रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी रात्री 9 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमीर शेख अजित शेख (24, रा.तेली स्कूलजवळ, भुसावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे.


अमळनेर शहरातील पैलाड भागातील चौकात बुधवार ,12 जून रोजी सायंकाळी पाच वाजता अजय रघुनाथ केले (56ा रा. प्रोफेसर कॉलनी, अमळनेर) यांच्यासह रवींद्र मधुकर पाटील, गजानन नाना सूर्यवंशी, गोपीचंद दगडू चौधरी आणि अमोल कैलास महाजन या पाच जणांच्या खिशातून संशयित आरोपी अमीर शेख अजित शेख (24, रा.तेली स्कूलजवळ, भुसावळ) याने एकूण 64 हजार रुपयांची रोकड लांबवली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर अजय केले यांच्यासह इतरांनी रात्री 9 वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर आरोपी अमीर शेख अजित शेख यांच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.