नंदुरबार : महिलेचे खून करून तिचे शिर धडावेगळे करीत आरोपींनी हे शीर एका प्लास्टीक पिशवीत टाकून धरणात टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. नंदुरबार जिल्हातील पळशी कोरडी प्रकल्पातील धरणात हा प्रकार घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

धरण किनारी आढळले शीर
विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसर्या खुनाच्या नोंद झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवापूर तालुक्यातील पळशी कोरडी प्रकल्पातील धरणात शेतकरी बैल धुण्यासाठी धरणाकडे आले असता त्यांना धरणाकिनारी निळे रंगाच्या प्लास्टीकच्या पिशवीत महिलेचे धडा वेगळे कापलेेले डोके (शीर) दिसून आले. विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व खांडबारा पोलिसांनी धाव घेतली. डोके पाण्यात असल्याने ते कुजलेल्या अवस्थेत मिळून आले आहे. याप्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप महिलेची ओळख पटू शकलेली नाही.


