बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील श्री शेत्र धुपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि.13/06/2024 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील श्री क्षेत्र धूपेश्वर येथील पूर्णा नदीपात्रावरील वॉटर सप्लाय येथे ठेकदार मजुरीने काम करणाऱ्या दोन युवकांचे आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास पाण्यात मृतदेह आढळून आले आहे
आज पहाटे सहा वाजेच्य सुमारास ही घटना उघडकीस आली
नंदकिशोर समाधान धांडे वय अंदाजे 32 वर्ष रा. विवरा
व सागर मधुकर कडू वय अंदाजे 30 वर्ष रा. विवरा असे मृतक युवकांची नावे आहेत याबाबत एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे दोघांचे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत आहे.


