भुसावळातील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या अरुणोदय शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ :

भुसावळ- येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील जी एन एम ए ची पहिल्या वर्षाची थोरगव्हाण येथील विद्यार्थिनी सुष्मिता महेश रोटे हिला अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या अरुणोदय शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येवून योजनेस प्रारंभ झाला आहे .

2020-21 या शैक्षणिक वर्षापासून आर्या फाउंडेशन संचलित अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या माध्यमातून दिव्यांग आणि निराधार विद्यार्थ्यांसाठी अरुणोदय शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून समाजातील दिव्यांग आणि निराधार विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात येऊन त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या दृष्टीने डॉ,वंदना वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे

या योजनेच्या माध्यमातूनच अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल मधील जी एन एम ए ची पहिल्या वर्षाची थोरगव्हाण येथील विद्यार्थिनी सुष्मिता महेश रोटे या विद्यार्थिनीला पालक नसल्यामुळे या विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, व ती स्वावलंबी होऊन तिला रोजगार उपलब्ध व्हावा तिच्या उज्वल भविष्याच्या दृष्टीने भुसावळ येथील सुप्रसिद्ध सक्षम कौन्सिलिंग सेंटरच्या अध्यक्षा सामुपदेशिका आरती चौधरी यांनी या विद्यार्थिनीची हलाखीची कौटुंबिक परिस्थिती समजल्यावर विद्यार्थिनीला पुस्तके व फी भरणे शक्य नव्हते हे लक्षात आल्यावर आरती चौधरी यांनी या विद्यार्थ्यांनीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे.
अध्ययन पॅरामेडिकल मधे अशा गरीब मुलामुलींसाठी ही अरुणोदय योजना राबविण्यात येत आहे.