भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी :

भुसावळ :

भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे शनिवारी सकाळी वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलरने जीवे मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर सातत्याने 8 ते 9 वेळा पुन्हा 7कॉल आले. त्यामुळे प्रमोद सावकारे यांनी सायंकाळी बाजारपेठ पोलिसात अनोळखी संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयीातचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे. या धमकी प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.


‘तुम्ही या प्रकरणात सहभागी होऊ नका. अन्यथा जीवे ठार मारू’अशी धमकी आमदार संजय सावकारे यांचे बंधू तथा कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे यांना मिळाल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.7 तुम्ही या प्रकरणात सहभागी होऊ नका. अन्यथा जीवे ठार मारू’अशी धमकी आमदार संजय सावकारे यांचे बंधू तथा कॉटन सेलचे संचालक प्रमोद सावकारे यांना मिळाल्याने खळबळ उडाली आहे .याप्रकरणी सायंकाळी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.