भुसावळ – भुसावळात २९ मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची निर्घृण हत्या केली . या प्रकरणी १० ते ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन ते तीन जणांना ताब्यात घेतले असल्याचेही कळते.

याप्रकरणी संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे (वय ४१, रा. मोहन पहिलवान नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड यांच्यासह दोन ते तीन अशा लोकांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे सर्वांनी मिळून कटकारस्थान रचत संतोष बारसे आणि सुनील राखुंडे या दोघांवर बुधवार रोजी दि. २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली आहे .
या प्रकरणी संशयित आरोपी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे करीत आहेत. दरम्यान, रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान शहरात दुहेरी हत्या झाल्याने व्यापाऱ्यांनी स्वयंघोषित बंद पाळला यामुळे मुख्य बाजारपेठेसह दुकाने बंद ठेवली होती तर शहरात शुकशुकाटासह तणावपूर्ण शांतता होती नागरिक भयभीत झाले
असून पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत . आरोपीना अटक करा तरच मृतदेह ताब्यात घेणार बारसे व राखुडे कुटुंबियांची मागणी : दरम्यान जळगाव सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मयत संतोष बारसे व मयत सुनील राखुडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आज गुरुवार रोजी दुपारी 3 वाजता करण्यात आले त्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून जोपर्यंत आरोपीना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाला ताब्यात घेणार नसल्याचे ठाम भूमिका घेतली आहे .




