रेल्वे हुबली ते योगनगरी ऋषिकेश / मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे
अधिक गाड्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि उन्हाळी हंगामात आरामदायी प्रवास देण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने रेल्वे हुबली ते योगनगरी ऋषिकेश / मुजफ्फरपुर दरम्यान उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1) हुबली ते योगनगरी ऋषिकेश उन्हाळी विशेष गाड्या (१० फेरी)
06225 विशेष हुबली येथून दि २९.०४.२०२४ ते २७.०५ .२०२४ पर्यंत दर सोमवारी २१.४५ वाजता वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १८.४५ वाजता योगनगरी ऋषिकेश येथे पोहोचेल. (०५ फेऱ्या)
06226 विशेष योगनगरी ऋषिकेश येथून दि ०२.०५ .२०२४ ते ३०.०५ .२०२४ पर्यंत दर गुरुवारी १७.५५ वाजता वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १७.३० वाजता हुबली येथे पोहोचेल. (०५ फेऱ्या)
थांबे – धारवर, बेलगाम, घाटप्रभा, मिराज, सांगली, कराड़, सातारा, पुणे, दौड़ कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाँव, मनमाड, भुसावल, खंडवा, भोपाल, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी ,मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाजियाबाद , मेरठ सिटी, रुरकी आणि हरिद्वार।
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय ,दोन वातानुकूलित-तृतीय, १२ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२२ डब्बे)
2) हुबली ते मुजफ्फरपुर उन्हाळी विशेष गाड्या (१० फेरी)
07315 विशेष हुबली येथून दि ३०.०४.२०२४ ते २८.०५ .२०२४ पर्यंत दर मंगलवारी १७.२० वाजता वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १३.४० वाजता मुजफ्फरपुर येथे पोहोचेल. (०५ फेऱ्या)
07316 विशेष मुजफ्फरपुर येथून दि ०३.०५ .२०२४ ते ३१.०५ .२०२४ पर्यंत दर
शुक्रवारी १३.०० वाजता वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.०० वाजता हुबली येथे पोहोचेल. (०५ फेऱ्या)

थांबे – धारवर, बेलगाम, घाटप्रभा, मिराज, सांगली, कराड़, सातारा, पुणे, दौड़ कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाँव, मनमाड, भुसावल, खंडवा, इटारसी, नरसिंगपुर, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, प्रयागराज छोंकी,पंडित दिन दयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय ,दोन वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान, ४ जनरल सेकंड क्लाससह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (२० डब्बे)
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


